न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ एप्रिल २०२०) :- पिंपरी – चिंचवड पोलिस आयुक्तालयात मनुष्यबळ अपुरे आहे. त्यातच कोरोनामुळे उपलब्ध मनुष्यबळ बंदोबस्तासाठी कमी पडत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालयातील काही विशेष पथके बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी नुकतेच याबाबतचे आदेश दिले.
पिंपरी – चिंचवड पोलिस आयुक्तालयामध्ये एकूण पंधरा पोलिस ठाणी आहेत. आयुक्तालयाच्या हद्दीत पस्तीस ते चाळीस लाख इतकी लोकसंख्या असून हद्द सुमारे ५०० चौरस किलोमीटर इतकी आहे. मात्र, सुरक्षेची जबाबदारी केवळ तीन हजार पोलिसांवर आहे. रात्र आणि दिवस पाळी, साप्ताहिक सुट्या, किरकोळ रजा यामुळे देखील यंत्रणेवर ताण पडत आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.


















