- सुखद घटना … रविवारी आणखी चार रुग्ण करोनामुक्त…
- दिघीतील परिसर सील..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ एप्रिल २०२०) :- मोशीमधील १९ वर्षीय तरूणीला करोनाची बाधा झाली असल्याचा अहवाल रविवारी सकाळी प्राप्त झाला. दरम्यान आज सोमवारी (दि. २७) रोजी शहरातील रूपीनगर परिसरातील आणखी तिघेजण करोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने रविवारी (दि. २६) रोजी ११६ जणांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविले होते. त्याचे रिपोर्ट आज आले आहेत.
त्यात रुपीनगर परिसरातील रहिवाशी असलेल्या २८ आणि २६ वर्षीय दोन पुरुषांचे तसेच २५ वर्षाच्या एक महिलेचे, असा एकूण तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे शहरातील करोना बाधितांची एकूण संख्या ८८ वर गेली आहे. सक्रीय रुग्णांची संख्या ६४ वर गेली आहे. महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी ६० रुग्ण दाखल आहेत.
तसेच रविवारी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल असलेल्या चार रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आजवर एकूण २८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान, दिघीतील कोकण मराठा संघ, गृह, सौंदर्य ब्युटी पार्लर, शहीद भगतसिंग मार्ग, त्रिमूर्ती सुपरमार्केट, श्रीशिवशंकर अपार्टमेंट, कोकण मराठा संघ गृह हा परिसर रविवारी रात्री अकरा वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत सील करण्याचा निर्णय घेतला आहे.


















