- आज आणखी दोघे कोरोनामुक्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ एप्रिल २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात कोरोना थांबण्यास तयार नाही. दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढत आहे. आज सायंकाळी सात नंतर आलेल्या अहवालामध्ये आणखी नव्याने दोन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. एक महिला आणि पुरुषाचा त्यात समावेश आहे.
आज चाचणी अहवाल सकारात्मक आलेले दोघे हे पिंपळे निलख व खडकी कॉन्टनमेंट या परिसरातील आहेत. पुरुषाचे वय ५३ वर्षे आणि महिलेचे वय ५० वर्षे आहे. दरम्यान शहरातील करोना बाधितांची संख्या १०७ वर पोहचली आहे. महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी ६३ रुग्ण दाखल आहेत.
तसेच आज खराळवाडी येथिल रहिवासी असलेने ०२ कोविड-१९ बाधित रुग्ण कै. य. च. स्म, रुग्णालय येथे दाखल होते. त्यांची दोन्ही वेळची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना आज घरी सोडण्यात आलेले आहे. एकूण ३१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.













