न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ एप्रिल २०२०) :- आयटी हब हिंजवडीलगत माण येथील बांधकाम प्रकल्पांवर काम करणारे शेकडो परप्रांतीय मजूर टाळेबंदीचे निर्बंध झुगारून मंगळवारी थेट रस्त्यावर उतरले.
टाळेबंदीची मुदत पुन्हा वाढण्याच्या शक्यतेने धास्तावलेले हे मजूर आपल्या मूळ गावी जाण्यासाठी व्यवस्था करा, अशी आग्रही मागणी करत होते. त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
माणकडून हिंजवडीच्या दिशेने ते जमावाने जाऊ लागले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर हिंजवडी पोलिसांचा ताफा तत्काळ घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी मजुरांची समजूत काढली.













