- एकाच्या चुकीमुळे कोरोनापासून कोसो दूर असणारा ‘ ब ‘ प्रभाग देखील आता कोरोनाबाधित…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० एप्रिल २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाने थैमान घातले असताना देखील शहरातील सुशिक्षित नागरिक अडाणीपणाचे सोंग घेऊन कोरोनाला बढावा देत आहेत. असाच काहीसा प्रकार चिंचवडगावातील माणिक कॉलनी परिसरात पहावयास मिळाला. पुण्यातील एक गृहस्थ गंजपेठ भागात वास्तव्यास आहेत. या गृहस्थांचा मुलगा नेहरूनगर परिसरात वास्तव्यास आहे. गंजपेठेतील परिसरात वाढत्या कोरोना रुग्णांमुळे महापालिका आणि पोलीस प्रशासनाने सील केला आहे. त्या परिसरात राहणाऱ्या या गृहस्थांना त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना त्यांच्या मुलाने नेहरूनगर येथे राहण्यास आणले. मात्र, त्यांना जास्त त्रास होऊ लागला म्हणून त्यांच्या मुलाने आपल्या वडिलांना हवापालट म्हणून माणिक कॉलनीत राहणाऱ्या आपल्या सासऱ्याच्या घरी आणून त्यांना मोकळ्या खोलीत ठेवले.
पुण्यातील त्या गृहस्थाना जास्तच त्रास होऊ लागल्याने त्यांच्या मुलाने त्यांना दोन दिवसांपूर्वी जवळच्या मोरया हाॅस्पिटल येथे ॲडमिट केले. मात्र त्यांनी त्या गृहस्थाना वायसीएम रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. कोरोना चाचणीत त्या गृहस्थांचा पाॅझिटिव्ह म्हणून अहवाल आला. काही दिवसांपूर्वी ही सर्व घडामोड घडली. त्यामुळे चिंचवडगावातील माणिक कॉलनी आणि परिसरातील नागरिकांचा रोष वाढला असून, कोणीही आपले घर सोडू नये, तसेच कोणत्याही पाहुण्याला घरी आणू नये, सरकारी कर्मचारी जीवाचे रान करत आहे. एवढीतरी जाणीव सर्वानी ठेवावी, असे मत व्यक्त करीत आहेत.
घटनास्थळी आरोग्य विभागाचे पथक रवाना झाले असून, परिसरचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. तसेच त्या गृहस्थांचा मुलगा, सासरे व त्यांच्या कुटूंबीयांना क्वारंनटाईन केले आहे. नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. दरम्यान महापालिका प्रशासन आणि पोलिसांकडून आज रात्री ११.०० नंतर परिसर सील केला जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान ते गुह्स्थ नेहरूनगर, चिंचवडगाव आणि मोरया हॉस्पिटल या ठिकाणी गेले होते. त्यामुळे रुग्णालय आणि त्यांनी भेटी दिलेल्या परिसरात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याच्या आधीच महापालिका प्रशासनाने हलचाली कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.


















