न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २. मे. २०२०) :- कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याच्या हेतूने, लागू केलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन, आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ९ एप्रिल, आंतरराष्ट्रीय अन्न सुरक्षा दिनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील रेशनकार्ड नसणाऱ्या ९०० लोकांना नुकतेच भोईर लॉन्स, बीआरटी रोड, पवनानगर येथे अन्न वाटप करण्यात आले.
यावेळी आझाद मित्र मंडळ स्पोर्ट्स क्लबचे उपसंस्थापक तथा स्वीकृत नगरसेवक विनोद हनुमंत तापकीर, माजी नगरसेवक प्रमोद ताम्हणकर, माजी नगरसेविका विमल काळे, प्रतिभा ताम्हणकर, रमेश काळे, आझाद मित्र मंडळाचे अध्यक्ष अतुल नढे, आबा भोईर, प्रभाग अध्यक्ष विशाल वाळके, भाजप चिटणीस धर्मा पवार, कार्तिक कृष्णन, प्रवीण केमसे, प्रमोद येवले, राहुल द्वारकुंडे, कल्पना काकूंद्रे, संगीता रोडगे, रवींद्र पवार, पंकज मिश्र, ज्ञानेश्वर काळे, आकाश भारती, महेश शिंदे, गजानन नढे, अभिषेक वाळके, पालिका अधिकारी शिंदे, लोखंडे, देठे,चव्हाण, माळी, आरोग्य निरीक्षक वाटाडे व आझाद मित्र मंडळाचे कार्यकर्ते व आदी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
जोपपर्यंत लॉकडाऊन आहे तोपर्यंत अन्न वाटप करण्यात येणार आहे. यापुढे कोणीही उपाशी राहणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ, असे आयोजकांकडून सांगण्यात आले.


















