न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २. मे. २०२०) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी साहेबराव गायकवाड यांची प्रतिनियुक्तीवर बदली झाली आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील अप्पर जिल्हाधिकारीपदावरुन त्यांची महापालिकेत अतिरिक्त (अप्पर) आयुक्त म्हणून बदली झाली आहे. यामुळे महापालिकेत आता तीन अतिरिक्त आयुक्त झाले आहेत.
दोन अतिरिक्त आयुक्त प्रतिनियुक्तवरचे आणि महापालिका अधिका-यांकरिता पदोन्नतीसाठी एक याप्रमाणे तीन पदे निर्माण करण्यात आली आहेत. पुन्हा तिसरे अतिरिक्त आयुक्तही प्रतिनियुक्तीवरील आले आहेत. त्यामुळे स्थानिक अधिका-यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. राज्य सरकारचे उपसचिव डॉ. माधव वीर यांनी याबाबतचा आदेश ३० एप्रिल रोजी काढला आहे.


















