- सुखद घटना… भोसरी आणि चऱ्होलीतील सात जण कोरोनामुक्त…
- आज मध्यरात्रीपासून सांगवी आणि पिंपळे गुरवचा परिसर सील…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २. मे. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज दोन रुग्ण पॉजिटिव्ह आले आहेत. यात दोन पुरुषांचा समावेश आहे. या दोघांचे वय अनुक्रमे ४६ व २० वर्षे असे आहे. त्यामुळे आजपर्यंत शहरातील सकारात्मक रुग्ण संख्या ११५ वर पोहोचली आहे.
तसेच शहरातील हद्दीबाहेरील रहिवासी परंतु पिंपरी चिंचवड महापालिका रुग्णालयात सद्यस्थितीत दाखल रुग्ण संख्या ०८ वर गेली आहे. महापालिकेच्या रुग्णालयात ५० कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. महापालिका हद्दीमधील रहिवासी परंतु पि.चिं.म.न.पा.क्षेत्राबाहेरील रुग्णालयात दाखल रुग्ण संख्या १० आहे. तर मृत रुग्णांची संख्या पाचवर गेली आहे.
आज भोसरी आणि चऱ्होली येथिल रहिवासी असलेले सात कोविड-१९ बाधित रुग्ण कै. य.च.स्मृ. रुग्णालय येथे दाखल होते. त्यांची दोन्ही वेळची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना आज घरी सोडण्यात आलेले आहे. त्यामुळे आजपर्यंत पी.सी.एम.सी. हद्दिमधील रहिवासी कोरोना (कोवीड-१९) मुक्त रुग्णांची संख्या ५२ झाली आहे.
आज मध्यरात्री ११.०० वाजलेपासून पुढील आदेशापर्यंत सांगवीतील मधुबन सोसायटी, जुनी सांगवी (कामटे फुड सर्व्हिसेस–श्री पॉलिक्लिनिक–महा ई सेवा केंद्र–महाराजा वाईन्स–स्पायसर कॉलेज रोड–स्पायसर पुल–मुळा नदी–सी.क्यू.ऐ.ई.बॉर्डर-कामटे फुड सर्व्हिसेस ) व गांगुर्डे नगर, शिरोडे रोड.
पिंपळे गुरव (विमल इलेक्ट्रिकल–शिरोडे रोड–पाण्याची टाकी– मराठी शाळा–कृतीका ऍक्वा–ऍक्सीस बँक ए.टी.एम.–युनायटेड डायग्नोस्टिक सेंटर–चंदन टी हाऊस-विमल इलेक्ट्रिकल) येथील परिसर पुढील आदेशापर्यंत सील करण्यात येत आहे. सदर परिसराच्या हद्दींमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केलेली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.


















