- डॉक्टर आपल्या दारी” उपक्रमांतर्गत केली नागरिकांची आरोग्य तपासणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ मे. २०२०) :- कोरोना या विषाणूचा वेगाने होणारा प्रसार टाळण्यासाठी, त्याचबरोबर नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची खात्री करून घेण्यासाठी, मोशीतील सिल्व्हर नाईन सोसायटी आणि परिसरात आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते डॉ. संतोष बारणे यांच्या पुढाकाराने “डॉक्टर आपल्या दारी” या उपक्रमाचे रविवारी (दि. ३) रोजी आयोजन करण्यात आले होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका व भारतीय जैन संघटना यांच्या सहयोगाने मोबाइल डिस्पेंसरी व्हॅनच्या माध्यमातून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच मोफत औषधेही देण्यात आली. आरोग्य तपासणीसाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, अशी माहिती डॉ. संतोष बारणे यांनी दिली.


















