- परिसरात कोरोनाचा रुग्ण नसतानाही देतोय, रुग्ण असल्याचा अलर्ट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ मे. २०२०) :- करोना बाधित रुग्णाची माहिती मिळावी यासाठी केंद्र सरकारने ‘ आरोग्य सेतू ‘ अॅप तयार केले आहे. या अॅपद्वारे करोना बाधित रुग्ण आपल्या जवळपास आल्यावर ते अॅप आपल्याला सूचित करते.
पिंपरी – चिंचवड शहरातील महात्मा फुलेनगरमधील नागरिकांना तुमच्यापासून ५०० मीटर अंतरावर करोना बाधित असल्याचे सतत दर्शवित आहेत. यामुळे येथील नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
महात्मा फुलेनगरमध्ये अद्याप एकही करोना बाधित रूण आढळलेला नाही. तरीदेखील येथील नागरिक योग्य ती खबरदारी घेत आहेत. केंद्र शासनाच्या आवाहनानुसार येथील नागरिकांनी ‘ आरोग्य सेतू ‘ हे अॅप डाऊनलोड केले आहे. मात्र येथील नागरिकांना तुमच्यापासून ५०० मीटर अंतरावर करोना बाधित रुग्ण असल्याचे अॅपद्वारे सांगितले जात आहे. यामुळे येथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.


















