न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ मे. २०२०) :- पुणे शहरातल्या मध्य भागातील एका पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस फौजदाराचा करोनामुळं मृत्यू झाला आहे. करोनामुळं एखाद्या पोलिसाचा मृत्यू होण्याची पुण्यातील ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे शहर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
पुणे शहरात यापूर्वी ९ पोलिसांना करोनाची बाधा झाली होती. त्यामुळे मध्य भागातील एका पोलीस ठाण्यातील सुमारे १०० पोलीस कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.


















