न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ मे. २०२०) :- पिंपरी-चिंचवड शहरात आणखी नऊ जण करोना बाधित आढळले असून यात दीड महिन्याच्या चिमुकलीचा आणि चार वर्षाच्या बाळाचा समावेश आहे. तसेच पुण्यातील एका ७५ वर्षीय महिलेचा देखील यात समावेश आहे.
त्यांच्यावर महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरातील करोना बाधितांची एकूण संख्या १३२ वर पोहचली असून आत्तापर्यंत ५५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ५ जणांचा मृत्यू करोनामुळे झालेला आहे. हे सर्व करोनाबाधित रुग्ण तळवडे, रुपीनगर, संभाजीनगर, जुनी सांगवी, शिवाजीनगर, पुणे येथील आहेत.


















