न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ मे. २०२०) :- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्यात बलात्कार प्रकरणी २५ वर्षीय आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. या २५ वर्षीय आरोपीला न्यायालयात हजर केलं असता, त्याला न्यायलायने दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
त्यानंतर त्याला शहरा बाहेरच्या कारागृहात पाठवून देण्यात आलं असून तो करोना विषाणूने बाधित असल्याचं समोर आलं आहे. तो पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात बाधित झाला नसल्याचं सूत्रांच म्हणणं असून कारागृहात गेल्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे असं त्यांनी स्पष्ट केल आहे.
दरम्यान, त्याच्या सोबत किंवा सानिध्यात आलेल्या पोलीस कर्मचारी व अधिकारी यांना रुग्णालयात नेण्यात आलं होत मात्र ते निगेटिव्ह आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


















