न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ मे. २०२०) :- डॉ. राजेंद्र कांकरिया आणि छाया कांकरिया या शिक्षक दांपत्याने आपल्या लग्नाला चाळीस वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मिळणाऱ्या पेन्शनमधून चाळीस हजार रुपयांची मदत सोमवारी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केली आहे.
मदतीचा हा धनादेश चिंचवड, हवेलीच्या तहसीलदार गीता गायकवाड यांच्याकडे त्यांनी सुपूर्द केला. याप्रसंगी त्यांचे जावई भावेश जैन, चैतन्य बारसावडे तसेच कन्या क्षितिजा जैन व प्रीतिजा बारसावडे आणि ४ वर्षांचा नातू युवांश जैन उपस्थित होते.
छाया कांकरिया ह्या गेंदीबाई चोपडा हायस्कूलमधील सेवानिवृत्त शिक्षिका असून डॉ राजेंद्र कांकरिया शिवाजी विद्यापीठाचे सेवानिवृत्त कुलसचिव आहेत व सध्या ते प्रतिभा महाविद्यालयात मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.


















