- आज तीन रुग्ण कोरोनाबाधित…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि ७ मे २०२०) :- पिंपरी चिंचवड औद्योगिकनगरीत कोरोनाने थैमान घातले असून, रोज दहा ते बारा रुग्ण कोरोनाबाधित आढळत आहेत. आज गुरुवारी शहरातील चिंचवड स्टेशन परिसरातील एका १८ वर्षीय युवकाला तसेच ३० तरुणाला व एका ३२ वर्षीय महिलेलादेखील कोरोनाची लागण झाली आहे.
तसेच पुण्यातील वाकडेवाडीतील एका २८ वर्षीय तरुणीला देखील कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधीतांचा आकडा १४७ वर पोहोचला आहे. तर, महापालिकेच्या रुग्णालयात ७५ जणांवर उपचार सुरु आहेत व ६० जण कोरोनामुक्त झालेले आहेत.















