न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि ७ मे २०२०) :- पुण्याचे विद्यमान अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांचे आज सकाळी पुणे येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
१७ सप्टेंबर २०१९ रोजी त्यांची पुणे येथे अप्पर जिल्हाधिकारी पदावर बदली झाली होती. तेथेही त्यांनी आपल्या उत्कृष्ट कामाचा ठसा उमटवला होता. मात्र, राज्यात सरकारची खांदेपालट होताच त्यांची बदली पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी करण्यात आली होती. त्यांच्या जागेवर माजी कृषी आयुक्त प्रभाकर देशमुख यांचे पुतणे विजय देशमुख यांची बदली करण्यात आली होती.
मात्र या बदलीच्या विरोधात ते न्यायालयात गेले होते. न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच साहेबराव गायकवाड यांच्या बाजूने निकाल देत त्यांची बदली पुन्हा त्यांच्या मूळ आस्थापनेवर म्हणजेच पुणे अप्पर जिल्हाधिकारीपदी केली होती. बदलीच्या घोळामुळे ते अनेक दिवस तणावात होते, अशी देखील माहिती समोर येत आहे.















