न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि ७ मे २०२०) :- देशभर वाढलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. गोरगरीब नागरिकांचा रोजगार बंद झाल्यामुळे त्यांना अन्न धान्याची टंचाई जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते व विद्यमान नगरसेवक दत्ता काका साने यांनी आपल्या चिखली प्रभाग क्र. १ मधील गरीब नागरिकांना धान्य वाटप करून मदतीचा हात दिला आहे.
बहुतांश नागरिक रोजंदारीवर काम करणारे व मोलमजूरी करून उदरनिर्वाह करणारे आहेत. त्यांचा लॉकडाऊनमुळे रोजगार बूडाला असून त्यांना आपल्या मुळगावी देखील जाणे शक्य होत नाही. या कुटुंबांची उपासमार होऊ नये म्हणून माणुसकी व कर्तव्याच्या भावनेतून दत्ता काका स्पोर्ट्स फाऊंडेशन व मित्रपरिवारच्या वतीने अशा गरीब ५०० ते ६०० कुटुंबांना रोज सकाळी १० ते १२ या वेळेत धान्य वाटप करीत आहेत.
जोपर्यंत पिंपरी चिंचवड शहरातील लॉकडाऊन उठत नाही तोपर्यंत आपण गरजू नागरिकांना मदत करणार आहोत, असे दत्ता काका साने यांनी सांगितले.















