न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि ७ मे २०२०) :- डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या मार्फत योगगुरु रामदेव बाबा यांच्याबरोबर दि. ६ मे २०२० ( बुधवार ) रोजी विशेष योग् वेब कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली. सद्य परिस्थितीत सर्वत्र कोविड -१९ (कोरोना व्हायरस) प्रसार होत आहे, त्यामुळे मानसिक आरोग्य डळमळीत होऊन त्याचा परिणाम शरीरावर होत आहे. या सर्वातून बाहेर पडण्यासाठी, मनोबल वाढविण्यासाठी, विशेष म्हणजे शारीरिक दृष्ट्या सुदृढ होण्याच्या उद्देशाने या वेब कॉन्फरन्स चे आयोजन करण्यात आले.
या कॉन्फरन्ससाठी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी.डी. पाटील, उपाध्यक्षा भाग्यश्री पाटील, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, सेक्रेटरी डॉ. सोमनाथ पाटील, विश्वस्त डॉ. स्मिता जाधव, खजिनदार आणि विश्वस्त डॉ. यशराज पाटील यांनी व्हिडीओ कॉन्फरंसद्वारे योगगुरु रामदेव बाबा यांच्याशी संवाद साधला.
या वेब कॉन्फरन्समध्ये योगगुरु रामदेव बाबा यांनी कोरोना चा मुकाबला करण्यासाठी रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी, निरोगी रहाण्यासाठी विविध प्राणायाम, योगासने तसेच काही आयुर्वेदिक औषधे या बद्दल मार्गदर्शन करून प्रात्यक्षिक दाखवले.
विशेष वेब योग कॉन्फरन्समध्ये प्राचार्य डॉ. गुणवंत येवला (आयु. कॉलेज) यांनी डॉ. डी. वाय पाटील आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये कोविड -१९ च्या आयसोलेशनची व्यवस्था नियोजित आहे. आयसोलेट रुग्णांनी बेडवरच कुठल्या प्रकारची आसने व प्राणायाम करता येतील?, प्राचार्य डॉ. शर्मा (होमिओपॅथी कॉलेज) यांनी या परिस्थितीमध्ये मानसिक आरोग्य कसे राखता येईल?, डॉ. भवाळकर (डीन मेडिकल कॉलेज) यांनी कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या स्टाफची सुरक्षा, डॉ. गोपालकृष्णन (डीन डेंटल कॉलेज.) यांनी दंतरोगावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी आणि स्टाफ यांनी प्रतिकार शक्ती कशी वाढवावी? उप प्रा. डॉ. प्रशांत खाडे (आयु कॉलेज) यांनी कोरोनाच्या लढवय्यांसाठी आपण काय संदेश द्याल? असे प्रश्न विचारले. या विशेष योग वेब कॉन्फरन्स चा लाभ ६७००० पेक्षा जास्त दर्शकांनी झूम, वेब लाईव्ह, फेस बुक लाईव्ह इ. माध्यमांद्वारे घेतला
या संवादाच्या वेळी योगगुरु रामदेव बाबा यांनी विविध प्राणायाम-अनुलोम-विलोम, भस्रिका कपालभाती, योगासने आणि आहार, ज्यामुळे श्वास घेण्याची व फुफ्फुसाची क्षमता वाढून शरीर बळकट होईल तसेच आयुर्वेदिक काढे, गुळवेल इ. वनस्पतींपासून बनविलेले काढे घेणे या विषयी मार्गदर्शन केले.
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे आणि युनिटेक सोसायटी यांच्याशी संलग्न असलेल्या सर्व संस्थांचे डायरेक्टर्स, डीन आणि प्रिंसिपल्स या कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले. योग गुरु रामदेव बाबांचे स्वागत कुलपती डॉ. पी.डी. पाटील यांनी केले. कुलगुरू डॉ. एन.जे.पवार यांनी विद्यापीठाची माहिती दिली. विश्वस्त डॉ. स्मिता जाधव यांनी आभार मानले.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन डॉ. साफिया फारुकी (डायरेक्टर ऑफ डिस्टन्स लर्निंग) यांनी केले.















