न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि ७ मे २०२०) :- बोऱ्हाडेवाडी येथे ओमकार डाइज कंपनीत दुपारी साडेबाराच्या सुमारास इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट झाले आणि आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले.
तासाभरात आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. आगीमध्ये कंपनीतील मेंटेनन्सचे साहित्य, कागदपत्रे, तीन संगणक, सीसीटीव्ही कॅमेरे, कपाट, सहा खुर्च्या, तीन पंखे, एसी मशीन, केबल वायर आणि पहिल्या मजल्यावरील केबिन जळाले आह. या आगीमध्ये सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.















