न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ मे २०२०) :- रहाटणीतील क्रांतिसूर्य क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फौंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये गुरुवारी बुध्द पौर्णिमा जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली.
गौतम बुध्दाच्या प्रतिमेस संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले. यावेळी लेखक बी. स. कांबळे, सचिन कळसाईत सर व अनुराग यादव सर उपस्थित होते.















