न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ मे २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरातील रावेतमधील पवना बंधाऱ्यात बुडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास उघडकीस आली.
परिसरातील नागरिकांनी महिला नदीत बुडाल्याची माहिती महापालिकेच्या अग्निशामक विभागास दिली. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी त्वरित धाव घेतली. त्यांनी गळांच्या मदतीने बंधाऱ्यात शोध घेतला असता, त्या महिलेचा मृतदेह सापडला.
मृत ३५ वर्षीय महिलेचे नाव सारिका संजय शिंदे असे असून, त्या महिलेला अचानक फिट आली आणि बंधाऱ्यावरून नदीत कोसळली, अशी माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. या मृत्यूप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.















