न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ मे २०२०) :- औरंगाबाद येथील चौदा मजुरांच्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या उत्तर भारतीय सेल च्या प्रदेश सचिव संजीवनी पान्डेय यांनी पोलीस आयुक्तलयात निवेदन दिले. आयुक्त त्या वेळी हजर नसल्याने, ड़ी सी पी जाधव ( गुन्हे शाखा) ह्यानी त्याचा स्विकार केला व पोलीस करत असलेल्या सर्व उपाय योजनांची महिती दीली . तसेच ह्या संबंधी समन्वय साधनार्या दोन्ही झोंन च्या डी सी पी. चा नम्बर शेयर करुन सर्वोतपरी साहायता करण्याची ग्वाही दीली.
पर प्रातियांना घरी परतण्या साठी सरकार ज्या ट्रेन सोडत आहे, त्यांची संख्या व प्रत्यक्ष प्रवास करणारयांची संख्या ह्यात खूप तफावत आहे, त्यामुळे परप्रांतीय त्यांचा नम्बर कधी लागणार ह्या चिंतेत आहेत. तसेच तो पर्यंत त्यांच्या खाण्या राहण्याचा प्रश्न ही त्याना भेडसावत आहे. ह्या धरतीवर ते फक़्त सरकार वर न विसंबता स्वबळा वर खाजगी वाहनानी ही प्रवास करुन आपल्या घरी परतू इच्छीत आहेत. पण त्या साठी लागणार्या पोलीस परमीशन ह्या ऑनलाइन च मिळत आहेत. जे त्यांच्या सारख्या कमी शीक्षित मजुर, कामगार लोकान साठी एक किचकट प्रक्रिया आहे. ह्या वर काही तरी दुसरा ही पर्याय उपलब्ध व्हावा असे संजीवनी पान्डेय ह्यानी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
त्याच बरोबर अशा लोकांसाठी हेल्प लाईन पोलीसांनी चालू करावी, जेणे करुन त्यावर येणाऱ्या तक्रारी वरुन ग्राउंड लेवल वर त्यांच्या काय समस्या आहेत ह्या पोलीस यंत्रणेला कळतील व त्या वर उपाय योजता येतील. तसेच पोलीस कक्षानी व्हट्स अप ग्रुप तयार करुन त्यात आमच्या सारख्या सामाजिक कार्यकर्त्याना सामिल करुन घ्यावे जेणे करुन आम्हाला कॉन्टैक्ट करणारयांचया समस्या आम्ही मांडू व त्या वर तातडीने उपाय योजना पोलीस यंत्रणा करु शकेल असे ही संजीवनी पान्डेय यांनी सुचवले.


















