न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ मे २०२०) :- गेल्या ४५ दिवसांच्या लॉकडाऊनंतर तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये दुकाने उघडण्यासंदर्भात केंद्र आणि राज्य शासनाने अटी शिथील केल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरात दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात येत आहे. शहरातील ज्या दुकानदारांना दुकाने उघडायची आहेत त्यांनी अर्जासोबत मिळकत कर भरल्याची पावती सोबत जोडण्याची अट महापालिकेने घातली होती.
याबाबत महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये चर्चा झाली व ही जाचक अट रद्द करण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे व शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी दिली. त्यामुळे शहरातील इतर दुकानदारांना दिलासा मिळाला आहे.


















