न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ मे २०२०) :- जमिनीच्या वादातून झालेल्या भांडणात १३ जणांनी घरात घसून मारहाण केल्याची घटना साखरे वस्ती, हिंजवडी येथे गुरुवारी (दि. ७ ) सकाळी घडली. अजनाबाई साखरे, अश्विनी साखरे, वैष्णवी साखरे, अलका साखरे, अनिता विठ्ठल साखरे, समिंद्रा साखरे, अनिता शिवाजी साखरे, बाबूराव निवृत्ती साखरे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
तर अशोक पांडूरंग साखरे (वय ५०), अमित अशोक साखरे ( वय ३१ ), संभाजी पांडूरंग साखरे ( वय ४२ ), सोमनाथ बाबूराव साखरे ( वय ३७ ), शिवाजी बाबूराव साखरे ( वय ३६ , सर्व रा . हिंजवडी ) या आरोपींवरही गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
राजेंद्र ज्ञानोबा साखरे ( वय ३९ ) यांनी याबाबत गुरुवारी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी राजेंद्र आणि त्यांचा चुलता तुकाराम साखरे आणि यांच्यातील अडीच एकर शेतीच्या वाटणीबाबत वाद आहे. याच वादाच्या कारणावरून गुरुवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी राजेंद्र साखरे यांच्या घरावर हल्ला केला.


















