न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ मे २०२०) :- आम्हाला आमच्या गावी जाऊ द्या, अशी मागणी करीत हिंजवडी परिसरातील बांधकाम साईटवर काम करणारे सुमारे दोनशे मजूर पुन्हा रस्त्यावर उतरले. हिंजवडीच्या लेमन चौकात त्यांनी गावी जाण्यासाठी त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
आमच्या हाताला काम नाही, तसेच रोगराई वाढण्यापूर्वी आम्हाला आमच्या गावी जाऊ द्या, अशी मागणी या मजुरांनी केली. याबाबत माहिती मिळताच हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी सर्व मजुरांना गावी जाण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. गावी जाण्यासाठी कसा अर्ज करायचा, याबाबत सविस्तर माहिती दिली. पोलिसांच्या माहितीमुळे मजुरांचे समाधान झाल्याने ते पुन्हा आपल्या घरी गेले.


















