न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ मे २०२०) :- गॅस सिलेंडर वितरित करणाऱ्या कर्मचाऱ्यास घरकुलमधील तीन जणांनी मारहाण करून त्यांच्याकडील साडेपाच हजार रुपयांची रक्कम हिसकावून नेली.
ही घटना घरकुलमध्ये गुरुवारी ( दि . ७ ) दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी तीन जणांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत ऊर्फ दाद्या मोरे (रा. पुण्यनगरी हौसिंग सोसायटी, घरकुल, चिखली) आणि त्याचे दोन साथीदार ( नाव , पत्ता माहिती नाही ) अशी आरोपींची नावे आहेत. निहालसिंग गवाप्रसाद ठाकुर ( वय २६ , रा . कृष्णानगर , चिंचवड ) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे.


















