न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ मे २०२०) :- कोरोनामुळे राज्यभरात अनेक ठिकाणी मजूर अडकून पडले आहेत. तसेच कुदळवाडी चिखलीमध्येही गेल्या दीड महिन्यापासून अडकुन पडलेल्या मजुरांना सर्व वाहतूक परवानगी घेऊन आमदार महेश लांडगे व चिखली पोलीस स्टेशन अधिक्षक सतीश माने यांनी बसचा नारळ फोडून निरोप दिला आहे.
त्यावेळी सर्वजण भावुक झाले होते. यावेळी मजुरांच्या व तेथे उपस्थित असणारे चिखली कुदळवाडी पोलीस चौकीचे सर्व अधिकारी, अनेक कार्यकर्ते व प्रशासनातील कर्मचारी यांच्या डोळ्याच्या कडा अलगद ओल्या झाल्या. यावेळी चिखली पोलीस स्टेशन अधिकारी सतीश माने, सचिन देशमुख, ज्ञानेश्वर धनगर, बागुल साहेब, नरहरी बालघरे, गणेश यादव, किशोर लोंढे, प्रसाद मायभट्टे, राहुल कांबळे, काका शेळके आदी उपस्थित होते.
मानवतेवर आलेल्या या भयाण संकटात ह्या मजुरांना पारनेरकर जनतेच्या माणुसकीच दर्शन झाल्यामूळे त्या मजुरांच्या डोळ्यात अश्रु तरळले होते. मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश येथील कामगारांना आपल्या घराकडे जाण्याची ओढ लागली होती. विलक्षण आनंद होता. टाळ्यांच्या गजरात या मजूर बांधवांना निरोप देण्यात आला.


















