न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ मे २०२०) :- कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर यंदाची जून महिन्यातील आषाढी वारी तसेच ६ जूनचा रायगडावरील पहिला शिवराज्याभिषेक सोहळा जवळ आला आहे. सर्व प्रकारचे धार्मिक कार्यक्रम राज्य सरकारने बंद ठेवून योग्य निर्णय घेतलेला आहे.
त्यामुळे यासारख्या सोहळ्यासाठी फक्त मोजक्याच ५०-१०० लोकांना परवानगी देण्यात यावी. तसेच सर्व धार्मिक स्थळे – मंदिरे, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा इ. पुढील ३ महिने बंद ठेवण्यात यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन गोडांबे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.


















