न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ मे २०२०) :- पिंपरी चिंचवड काॅन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस ५ टन तांदुळ आणि १ टन तूरडाळची मदत करण्यात आली. हे धान्य इंद्रायणीनगर येथील अन्न पुरवठा केंद्रात पाठविण्यात आले आहे.
यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे ,आयुक्त श्रावण हर्डीकर, विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, माजी महापौर संजोग वाघेरे, पिंपरी चिंचवड काॅन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष बिपीनशेट नाणेकर, महेश शिंदे, सी.एन.गायकवाड, अशोक शिरोळे, संभाजी दौडकर, सचिन जाधव, जावेद पटेल, दिपक धवन, हर्षद शेख,कल्याण भोसले, संजय शिंदे, एच.एम.शिंदे, शितल पवार उपस्थित होते.


















