न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मे. २०२०) :- पिंपरीगाव-पिंपळे सौदागर, पवनेश्वर – तापकीरनगर हे दोन्ही पूल वाहतुकीसाठी खुले करण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
पिंपरीगावातून काळेवाडी, थेरगाव, चिंचवडगावाला जाण्यासाठी पवनेश्वर – तापकीरनगर पुलाचा वापर केला जातो. या पुलावर कायमच वर्दळ असते. तर, पिंपरीगावातून पिंपळे सौदागर, सांगवी, नवी सांगवी, औंधला जाण्यासाठी पिंपरीगाव – पिंपळे सौदागर पुलाचा वापर केला जातो.
मात्र, कोरोनामुळे हे पूल वाहतुकीस बंद करण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांना एम्पायर इस्टेट पूल किंवा कासारवाडीहून वळसा घालून जावे लागत होते. आता या पुलावरील वाहतूक सुरू करण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.


















