न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मे. २०२०) :- विधान परिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्ज दाखल केला आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी हा अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान भवनात येऊन विधान परिषद सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला.
विधीमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांच्याकडे त्यांनी हा अर्ज सोपवला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेही होत्या. तसंच आदित्य ठाकरेही होते. विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक होणार आहे. यामध्ये महाविकास आघाडीचे ५ तर भाजपाचे ४ उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे.
नऊ रिक्त जागांसाठी निवडणूक, कोणत्या पक्षाचे उमेदवार कोण?
उद्धव ठाकरे-शिवसेना
नीलम गोऱ्हे-शिवसेना
राजेश राठोड-काँग्रेस
राजकिशोर मोदी-काँग्रेस
रणजितसिंह मोहिते पाटील-भाजपा
गोपीचंद पडळकर-भाजपा
प्रवीण दटके- भाजपा
डॉ. अजित गोपचडे-भाजपा


















