न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मे. २०२०) :- पुण्यातील भवानी पेठेतील रहिवासी पण पिंपरी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा आज (सोमवारी) कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
या पुरुष रुग्णाचे वय ५७ होते. भवानी पेठेतील रहिवासी असलेल्या या ५७ वर्षीय रुग्णाला ८ मे रोजी कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांच्यावर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांना कोरोनाव्यतिरिक्त इतर आजारही होते. उच्चरक्तदाबाचाही त्रास होता.















