- यापुढे देखील महापालिका प्रशासनास सहकार्य करून, कोरोनावर मात करू – तुषार कामठे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ मे. २०२०) :- पिंपळे निलखमधील एका व्यक्तीची (दि. २६ एप्रिल) कोरोना चाचणी पाॅझीटीव्ह आली होती. त्यांनी सोमवारी कोरोनावर यशस्वी मात केली. त्यामुळे ते आपल्या घरी परतले आहेत. अखेर पिंपळे निलख व विशालनगर कोरोना मुक्त झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
नगरसेवक तुषार कामठे म्हणाले, ग्रामस्थांनी अतिशय काटेकोरपणे लॉकडाऊनचे पालन केल्याने गेल्या काही दिवसात एकही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही. आपल्या परिसरामध्ये एकही कोरोना रुग्ण नाही व येथुन पुढे ही आपण दक्षता घेऊन कोरोनाला हद्दपार करण्याचा निर्धार करू. तसेच यापुढे दुकाने नियमीत चालु झाली तरीसुध्दा, सर्वांनी आपली, आपल्या कुटुंबाची व आपल्या परिसराची काळजी घेऊन, प्रशासनास सहकार्य करावे.













