न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मे. २०२०) :- तळेगावातील पहील्या कोरोना बाधित महीला परिचारिकेचा कोविड – १९ चाचणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. तसेच माळवाडीतील दुस – या कोरोना बाधित परिचारिकेच्या संपर्कातील पती आणि दोन्ही मुलांचे चाचणी अहवालही मंगळवारी ( दि. १२) रात्री निगेटीव्ह आल्याची माहिती मावळचे तहसीलदार मधुसुदन बर्गे यांनी दिली.
यामुळे माळवाडीसह तळेगावकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तळेगावचे वैदयकीय अधिकारी डॉ प्रवीण कानडे यांनी दिलेल्या माहितीनुसार चाचणी अहवाल पॉझिटीव्ह असला तरी कुठलीही भौतिक लक्षणे न आढळलेल्या मावळातील पहील्या कोरोना बाधित महीलेला ७ मे रोजी पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
विशेष म्हणजे त्या परिचारिकेने कठल्याही विशेष उपचारांशिवाय प्रबळ रोगप्रतिकारक शक्तीने कोरोनावर मात केली आहे. तिचा रिपोर्ट मंगळवारी (दि. १२ ) रात्री निगेटीव्ह आला आहे.


















