न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मे. २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेत आयुक्त हर्डीकर यांनी बदलीची मोहीम फत्ते केली आहे. शहर अभियंतापदावर राजन पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे स्थापत्य मुख्यालय, ‘अ’,’ब’,’क’,’ई’,’फ’ आणि ‘ग’ क्षेत्रीय कार्यालये, उद्यान स्थापत्य विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. श्रीकांत सवणे आणि रामदास तांबे यांना सहशहर अभियंता पदावर बढती देण्यात आली आहे. सवणे यांच्याकडे बीआरटीएससह विशेष प्रकल्प तर तांबे यांच्याकडे पाणीपुरवठा – जलनिस्सा:रण विभाग, पर्यावरण विभाग सोपवण्यिात आला आहे. तर, सहशहर अभियंता मकरंद निकम यांच्याकडे बांधकाम परवानगी, अनधिकृत बांधकाम, नियंत्रण विभाग सोपविण्यात आला आहे.
विजयकुमार काळे, शिरीष पोरेडी, अजय सुर्यवंशी, सुनील भागवानी, सुनील वाघुंडे, अनिल शिंदे, आबासाहेब ढवळे आणि रामनाथ टकले यांना कार्यकारी अभियंता पदावर बढती देण्यात आली आहे. काळे यांच्याकडे जलनि:सारण ‘क’, ‘इ’, ‘फ’, ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय, पोरेडी ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय, सुर्यवंशी पाणीपुरवठा प्रकल्प, भागवानी, ढवळे यांच्याकडे बांधकाम परवानगी, अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग, वाघुंडे ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय, स्थापत्य (उद्यान), शिंदे जलनि:सारण अ,ब,ड,ग क्षेत्रीय कार्यालय आणि टकले यांच्याकडे ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाची नव्याने जबाबदारी देण्यात आली आहे.
याखेरीज कार्यकारी अभियंता पी.आर.पुजारी यांच्याकडे पंतप्रधान आवास योजना, डी.आर जुंधारे यांच्याकडे पाणीपुरवठा विभाग, प्रशांत पाटील यांच्याकडे ‘ब’ क्षेत्रीय स्थापत्य विभाग, एस.एन.इंगळे यांच्याकडे बीआरटीएस विभाग आणि पी.एस.ओंभासे यांच्याकडे बीआरटीएस परिवहन कक्ष या विभागाची जबाबदारी नव्याने सोपविण्यात आली आहे.


















