न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मे. २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. या संख्येला अटकाव करण्यासाठी महापालिका स्तरावर अनेक उपाययोजना करूनही कोरोना हद्दपार होताना दिसून येत नाही.
आज बुधवारी रहाटणीतील एका ६८ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. ही महिला पुण्यातील महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली आहे. मंगळवारी एकाच दिवशी चऱ्होलीत सर्वात जास्त संख्येने कोरोना रुग्ण आढळले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
शहरातील कोरोना रुग्णांची संख्या १७५ वर पोहोचली आहे. तर ५२ रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. तसेच शहरातील १११ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.













