न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मे २०२०) :- लॉकडाऊनमुळे बंद पडलेल्या पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या गृहप्रकल्पांचे आणि मोशी येथील खुल्या प्रदर्शन केंद्राचे काम सुरू होणार आहे.
प्राधिकरणाने याबाबत संबंधित प्रकल्पांच्या कंत्राटदाराला त्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र, वाहतुकीसाठी कंत्राटदाराला महापालिकेकडून पास लागणार आहे. प्राधिकरणाचा पेठ क्रमांक १२ मध्ये सुरू असलेला गृहप्रकल्प १ व २ तसेच वाल्हेकरवाडी येथील गृहप्रकल्पाचे काम ठप्प पडले होते.
त्याशिवाय, मोशी येथील पुणे आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्रातंर्गत होत असलेल्या खुल्या प्रदर्शन केंद्राचे कामही थांबले होते. ही सर्व कामे आता सुरू होऊ शकणार आहेत.


















