न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मे २०२०) :- दापोडी स्मशानभूमीजवळ काही लोकांची गर्दी होत होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आली आहे. त्यामुळे ही गर्दी पांगवण्यासाठी पुणे रेल्वे पोलीस दलातील पोलीस शिपाई वाघमारे गेले असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली.
ही घटना बुधवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास दापोडी स्मशान भूमीजवळ घडली. सिद्धार्थ दत्तू वाघमारे (वय ३१, रा. खडकी) असे मारहाण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी आयाज भिकात शेख, गालिब भिकान शेख (वय २८), समीर सलीम शेख (वय १८, सर्व रा. दापोडी) यांना अटक केली आहे. यांच्यासह अन्य सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर भारतीय दंड विधान कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.















