न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मे २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज सकाळी आलेल्या अहवालानुसार चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात एका २८ वर्षीय पुरुषासह ५८, ४०, २३ वर्षीय महिलांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. तर पुण्यातील गाडीतळ येथील एका ५० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच आज ताडीवाला रोड, पुणे येथील एक रहिवासी कोविड १९ बाधित रुग्ण वायसीएम रुग्णालय येथे दाखल होते. त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे.
आज चाचणी अहवाल सकारात्मक ( पॉझिटीव्ह ) आलेले रुग्ण जुनी सांगवी, च-होली, चिंचवडस्टेशन, आकुर्डी येथील येथील रहिवासी असून पिंपरीतील वायसीएम, नविन भोसरी रुग्णालय व पुणे महानगरपालिकेचे रुग्णालय येथे दाखल आहेत.
दरम्यान कोरोनाग्रस्तांची संख्या १८३ वर पोहोचली असून, ५७ रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत ११६ रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत.


















