न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मे २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रूग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल असणाऱ्या कोवीड १९ बाधित रूग्णांवर रुग्णालयातील डाॅक्टर्सच्या अथक परिश्रमाला यश आले असून ८१ वर्षाच्या रूग्णासह ३० वर्षाच्या युवकाला आज डीस्चार्ज देण्यात आला.
वैद्यकिय अधिष्ठाता डाॅ राजेंद्र वाबळे व मेडिसीन विभागाचे प्रमुख डाॅ प्रविण सोनी यांचे मार्गदर्शनाखालील पथकाने कोवीड १९ बाधित या रूग्णांवर उपचार केले. दोन्ही रूग्णांची स्थिती खालावलेली असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. तथापि डाॅक्टरांनी केलेले योग्य उपचार व परिश्रमाने रूग्णांना बरे करण्यात यश आले. १४ दिवस रूग्णालयात उपचार केल्यानंतर आज त्यांना रूग्णालयातून सोडल्यानंतर १४ दिवस होम क्वारंटाईन होण्याच्या सूचना देण्यात आल्या. हे दोन्ही रूग्ण पुण्यातील रहिवासी होते.
ह्या रुग्णांना घरी सोडतांना निरोप देण्यात आला. यावेळी अधिष्ठाता डॉ राजेंद्र वाबळे, डॉ प्रविण सोनी, डॉ किशोर खिल्लारे, डॉ अनिकेत लाठी, डॉ स्मिता पानसे, डॉ कौस्तुभ कहाने, डॉ अभयचंद्र दादेवार, डॉ अक्षय शेवाळे, डॉ वालिद, परिचारिका श्रीमती सुर्वे, श्रीमती संगीता पाटील आदि उपस्थित होते.