न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मे २०२०) :- निगडीतील गावी गेलेल्या दोन सख्या भावांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना माळशिरस तालुक्यातील उघडेवाडी या गावात शुक्रवारी (दि. १५) रोजी दुपारी घडली. हर्षद शामराव भगत (वय १२) व सिद्धार्थ शामराव भगत ( वय १) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत.
ते यमुनानगर येथील माता अमृतामयी शाळेत शिकण्यास होते. तर शामराव भगत हे रिक्षाचालक आहेत. नातेवाईक आजारी असल्याने त्यांना पाहण्यासाठी सर्व कुटुंबीय माळशिरस तालुक्यातील उघडेवाडी या गावी गेले होते. ओटास्कीम परिसरात करोना बाधित रुग्ण आढळल्यामुळे भगत कुटुंबियांनी गावीच राहणे पसंत केले. मुले पोहायला शिकण्यासाठी आपल्या पालकांसह शेततळ्यावर जात होते. त्यातच ही घटना घडली.