न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मे २०२०) :- कोरोना विषाणूचा संसंर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असताना, पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांची उपासमार होऊ नये, म्हणून अनेक व्यापारी मित्रांनी आपल्या जिवाची पर्वा न करता, नागरिकांच्या सोयीसाठी आप-आपली दुकानं सुरू केली आहेत. या माध्यमातून ते सामाजिक कार्यात मोलाचा वाटा उचलत आहेत.
एक सामाजिक बांधिलकी जपत सांगवी व्यापारी असोसिएशन व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे मित्र परिवार यांच्या वतीने व सांगवी व्यापार असो. चे सेक्रेटरी जितेंद्र गुगळे यांच्या वाढदिवसानिमित्त सांगवीतील सर्व व्यापारी मित्रांना सुरक्षितेतेसाठी मास्क, हॅन्ड ग्लोज, हातमोजे, सॅनेटायझर व होमिओपॅथी (प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी) गोळ्या व औषधाचे महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
याप्रसंगी महापौर उषा उर्फ माई ढोरे, भन्साळी भाभी, रमेश ओसवाल, कांतीलाल खिवंसरा, निलेश वागळे, जितेंद्र गुगळे, पंकज मुथ्था, सचिन गांधी, स्वनिल वाघे, रवी क्रोद्रे व सांगवी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष जवाहर ढोरे आदी उपस्थित होते.















