न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मे २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात लॉकडाऊनमुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. हातातील काम गेल्यामुळे गोरगरीब नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यासाठी शिवसेना उपनेते व शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुढाकार घेत, पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्र ९, नेहरूनगर – अजमेरा परिसरातील गरजूंना अन्नधान्याचे किट व मास्कचे आज रविवारी वाटप केले.
या प्रसंगी शिवसेना भोसरी विधानसभा समन्वयक प्रा. दत्तात्रय भालेराव, विभाग प्रमुख प्रदीप चव्हाण, युवा विभागप्रमुख विपुल टेहरे, उपविभाग प्रमुख अनिल कोकीलकर, शाखाप्रमुख संभाजी मासुलकर, प्रकाश जाधव उपस्थित होते.















