- शहरात पाचव्या मृत्यूची नोंद; भोसरीतील ४० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मे. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज मंगळवारी सकाळी आलेल्या अहवालानुसार नव्याने तीन जणांचा कोरोना अहवाल सकारात्मक आलेला आहे. यात एका ७८ वर्षीय वृद्धाचा आणि ६० व ३१ वर्षीय महिलांचा समावेश आहे.
हे तिघे भोसरी व रुपीनगर परिसरातील रहिवाशी आहेत. तर पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील आंबेगाव येथील एका ३८ वर्षीय पुरुषालादेखील कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंत सकारात्मक रुग्णांची संख्या २२९ वर पोहोचली आहे. आजपावतो महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी ८२ रुग्ण दाखल आहेत.
तसेच आज मंगळवारी शहरात पाचव्या मृत्यूची नोंद झाली आहे. भोसरीतील ४० वर्षीय महिलेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. तर आजपर्यंत १३१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.















