न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मे. २०२०) :- कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका सभा दोन महिन्यात झालेली नाही. त्यामुळे मान्सूनपुर्व अत्यावश्यक व पावसाळ्यात नागरिकांना त्रासदायक ठरणारी कामे करणेसाठी व तत्संबंधी निविदा मुदतवाढीसारखे आदेश काढणेकामी स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र दिले आहे.
या पत्रात लोंढे यांनी महानगरपालिका मुख्य कार्यालयासह इतर कार्यालये, दवाखाने, रूग्णालये या वरील छतसफाई, रस्तेसफाई, शहरातील अत्यावश्यक सेवेतील आरोग्य विभागाकडील साफसफाईची कामे, नाला, ड्रेनेज सफाई करणे, स्ट्रॉमवॉटर लाईन स्वच्छ करणे, जंतूनाशक खरेदी, वैद्यकीय विभागासाठी आवश्यक साहित्य, औषधे उपलब्ध करून घेणे, पाणीपुरवठा, जलनि:स्सारण, विद्यूत देखभाल दुरूस्तीच्या कामांचे बाबतीत तसेच सुरक्षा रक्षक, वॉर्डन पुरविणे बाबत आयुक्त यांनी आढावा घ्यावा व पुढील कार्यवाही करावी. यासाठी संबंधितांना आदेश द्यावेत, असे या पत्रात स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांनी म्हटले आहे.















