- भोसरीतील आणखी एका वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू…
- तर, भोसरीतील एक जण कोरोनामुक्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मे. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज मंगळवारी दुपारी आलेल्या अहवालानुसार नव्याने चार जणांचा कोरोना अहवाल सकारात्मक आलेला आहे. यात ६५ आणि ५४ वर्षीय पुरुषांचा तर, ३१ आणि २९ वर्षीय महिलांचा समावेश आहे. हे चौघे चिंचवड स्टेशन येथील आंनदनगर व भोसरी परिसरातील रहिवाशी आहेत.
तर पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील शिवाजीनगर, येरवडा, पुणे छावणी व बीड जिल्ह्यातील सात पुरुषांना आणि दोन महिलांना कोरोनाची बाधा झाली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील आजपर्यंत सकारात्मक रुग्णांची संख्या २३३ वर पोहोचली आहे. आजपावतो महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी ८४ रुग्ण दाखल आहेत.
तसेच आज मंगळवारी शहरात सहाव्या मृत्यूची नोंद झाली आहे. भोसरीतील ७८ वर्षीय वृद्धाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. तर आज भोसरीतील एकाला घरी सोडण्यात आलेले आहे. त्यामुळे आजपर्यंत १३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.















