न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मे. २०२०) :- सध्या संपूर्ण देशात लॉकडाउन ४.० सुरु आहे. पहिल्या तीन लॉकडाउनच्या तुलनेत चौथ्या लॉकडाउनमध्ये नियम थोडे शिथिल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र सरकारने चौथ्या टप्प्याच्या लॉकडाउनसाठी मार्गदर्शकतत्वे जाहीर केली आहेत.
२२ मे पासून नवीन आदेश लागू होणार असून ते ३१ मे पर्यंत कायम राहतील. मुंबई महानगर प्रदेशासह पुणे, नाशिक, सोलापूर, मालेगाव, नागपूर, सोलापूर, जळगाव, अकोला, अमरावती. औरंगाबाद ही महापालिका क्षेत्र रेड झोन म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. रिपब्लिक वाहिनीने हे वृत्त दिले आहे. रेड झोनच्या बाहेर ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये बस, टॅक्सी वाहतुकीस मुभा देण्यात आली आहे. या महापालिकांव्यतिरिक्त राज्यातील उर्वरित भाग रेडझोन बाहेर असेल. कंटेनमेंट झोनमध्ये फक्त जीवनावश्यक गोष्टींना परवानगी देण्यात येईल.
हे बंद राहणार
– ट्रेन, मेट्रो, विमान सेवा सर्वच झोनमध्ये बंद राहणार.
– आंतरराज्य रस्ते वाहतूक बंदच राहणार.
– शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल, हॉटेल, मॉल, प्रार्थनास्थळे, बंदच राहणार.
– सलून, स्पा सर्वच झोनमध्ये बंदच राहणार.
काय सुरु राहणार
– दारु दुकाने (रेड झोनमध्ये होम डिलिव्हरीला परवानगी), कंटेनमेंट झोनमध्ये बंद राहणार, अन्य झोनमध्ये सुरु राहणार.
– वैद्यकीय दवाखाने कंटेनमेंट झोन वगळता सर्वत्र सुरु राहणार.
– कंटेनमेंट झोन वगळता हॉटेलमधून होम डिलिव्हरीला परवानगी.
– कंटेनमेंट झोन वगळता आरटीओ कार्यालये सुरु राहणार















