न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मे २०२०) :- पिंपरी-चिंचवडमधील वाकड परिसरातील पार्क स्ट्रीटसमोरील सबवे प्रकल्पास माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांनी नुकतीच भेट दिली. परिसरातील नागरिकांची हा प्रकल्प लवकर वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी आहे.
कोरोनामुळे या कामास आधीच विलंब झालेला आहे. शहरातील प्रलंबित विकासकामे सुरु करण्यास महापालिकेने नुकतीच मान्यता दिली आहे. त्या अनुषंगाने व नागरिकांच्या मागणीची दखल घेत, माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांनी घटनास्थळी जाऊन कामाची माहिती घेतली.
महापालिकेच्या बीआरटीएस विभागाचे कार्यकारी अभियंता, उप कार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता यांना पार्क स्ट्रीटसमोरील सबवे प्रकल्पाचे उरलेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना केल्या आहेत, अशी माहिती स्थनिक नगरसेविका ममताताई विनायक गायकवाड यांनी न्यूज पीसीएमसीशी बोलताना दिली.