- पोलीस आयुक्तालयातील एका अधिकाऱ्यासह चार जणांना कोरोना…
- सांगवीतील मधुबन सोसायटीतील एका जण कोरोनामुक्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मे २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात महापालिका अंतर्गत रुग्णालयात आज बुधवारी सकाळी व दुपारच्या सत्रात सुदैवाने कोरोनाचे रुग्ण आढळले नाहीत. मात्र, पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील येरवड्यातील एका ७१ वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.
तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एका पोलीस निरीक्षकासह चार पोलीस कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आजपर्यंत पोलीस आयुक्तालयातील सात जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे.
तसेच जुन्या सांगवीतील मधुबन सोसायटीतील एका जणाची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १३३ वर पोहोचली असून, पिंपरी चिंचवड शहरातील आजपर्यंत सकारात्मक रुग्णांची संख्या २३३ वर पोहोचली आहे. आजपावतो महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी ८३ रुग्ण दाखल आहेत.