न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मे २०२०) :- गायक उत्कर्ष शिंदे याने सामाजिक भान ठेवत पिंपरी-चिंचवड परिसरातील कला क्षेत्रातील अत्यंत गरजू व्यक्तींना रेशन किटचं वाटप केलं आहे. यात कवी आणि गीतकार हरीनंद रोकडे यांना देखील त्याने मदत केली.
कलाकारांवर उपासमारीची वेळ आल्याने उत्कर्ष त्यांच्या मदतीला धावून गेला आणि तीन महिने पुरेल येवढे रेशन त्यांनी रोकडे यांना दिले. त्याने शहरातील ४५० गरजू कलाकार कुटुंबाना मदत केली आहे. स्वतः त्याने त्यांच्यापर्यंत रेशन पोहचवलं आहे. ‘स्वर सम्राट चॅरिटेबल ट्रस्ट’च्या माध्यमातून त्याने ही मदत केल्याच सांगितलं आहे.